
सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या पॅंनलच्या उमेदवार डॉ. अर्चना रामचंद्र सावंत यांच्या विजयासाठी भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मैदानात उडी घेतली आहे. माजगाव सह ५२ ग्रामपंचायतीत जात ते आढावा घेत आहेत. तर माजगावात युतीच्या डॉ. अर्चना सावंत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला.