
सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा
सावंतवाडी : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली न.प.च्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आली असून नगराध्यक्षा २० सह्या मारतात तर सीओंना सह्या मारायला प्रोब्लेम काय ? असा आक्रमक पवित्रा घेत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सीओंना जाब विचारला.
आम्ही लोकांतून निवडून आलेले नगरसेवक आहोत. झेरॉक्स कशासाठी देता ? २० सह्या नगराध्यक्षा मारत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे ? असा सवाल करत सभेच्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगराध्यक्षांनी यापुढे अशी चूक होणार नाही असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर आदीसह सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.











