
सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंजूर केलेली विकासकामे सद्यस्थितीत शहरात सुरू असून सालईवाडा येथील गटार योजनेच्या कामाची संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली.
यावेळी सावंतवाडी शहर मंडळ सरचिटणीस विनोद सावंत, उपाध्यक्ष अनिल सावंत, बूथ अध्यक्ष संतोष उर्फ पिंट्या सावंत, गणेश कुडव, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अथर्व सावंत प्रवीण मोरजकर व सालईवाडा भागातील नागरिक उपस्थित होते.