सावंतवाडीतील मटका, जुगार बंद करण्यासाठी संजू परब आक्रमक

उद्या पत्रकार परिषद
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 09, 2022 14:35 PM
views 394  views

सावंतवाडी : सावंतवाडीत सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे ? याचा पर्दाफाश भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब उद्या करणार आहेत. राजरोस सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संजू परब भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेय.

शहरात सध्या मटका व जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून याच्या युवा पिढी आहारी गेली आहे. अनेक तरुण मटका, जुगाराच्या मागे धावतात त्यामुळे त्यांचा शिक्षणावर देखील परिणाम होतो. या संदर्भात जिल्ह्यात पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांच संजू परब यांनी लक्ष वेधले होते. मटका, जुगार बंद व्हावा अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान,  संजू परब आता उद्या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील पुढील भूमिका जाहीर करणार असून काही गौप्यस्फोट देखील करणार आहेत.