....तर 7/12 चोर मोती तलावात कन्स्ट्रक्शन करतील !

लॉज, हॉटेल्सवर कोण थांबलेत ? ते पोलिसांनी तपासावं : संजू परब
Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2025 14:11 PM
views 293  views

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटीसाठी घातलेल्या अटींमुळे ते रखडत आहे. त्यामुळे  त्यासाठीची जागा मोफत द्यावी असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. तर २० वर्ष मोती तलावावर केस आहे‌. भाजपला निवडून दिल्यास मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही. नगरपरिषदेच्या विरोधात कोर्ट केस असून भाजपची सत्ता आल्यास 7/12 चोर कन्स्ट्रक्शन करताना दिसतील असं विधान श्री.परब यांनी केल‌.तसेच सावंतवाडीतील लॉज, हॉटेलवर बाहेरून येऊन कोण राहतात याचा शोध पोलिसांनी घ्यावा. शहराची शांतता बिघडू देऊ नये अस मत व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवण्याच काम काही मंडळी करत आहे. भाजपचे नेते येतात तेव्हा ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते. स्वतःसह नेत्यांना, पक्षाला फसवण्याच काम ते करत आहेत. ज्यांना इथे कोणी ओळखत नाही अशी बाहेरची माणसं आणली जातात. त्यामुळे शहरात काही घडलं तर त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील. बाहेरची लोक इथे येत असून पोलिसांनी हॉटेलस चेक करावी. चार-चार दिवस ते का थांबलेत? याची माहिती घ्यावी. तसेच घरात घुसून जबरदस्ती फोटो काढण्याचं काम भाजप करत आहे. या गोष्टी पोलिसांनी थांबवाव्या. अन्यथा, आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. भाजपचे ६० टक्के कार्यकर्ते आम्हाला मदत करत आहेत. त्यांना पक्षात सन्मान मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेला मदत होत आहे. आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत. मात्र, लॉज, हॉटेलवर कोण थांबलेत ते बघावं‌. ही मंडळी कोण आहेत ? त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल आहेत का ? हे पहावं लागेल. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कराणर आहे. युपी, बिहारची माणस असून यामुळे शहरातील शांतता भंग होईल. त्यामुळे पोलिसांनी यावर कार्यवाही करावी. शहरातली शांतता बिघडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, तिनं नगराध्यक्ष शिवसेनेचे असतील शहर विकास आघाडीचे एक असे चारही नगराध्यक्ष आमचेच असणार असा विश्वास व्यक्त केला. तर मागेही माझ्या विरोधात प्रचारा झाला‌. पण, लोकांनी निवडून दिल.आता मी नाही तर बाहेरून येणारे रिटर्न जातील. पण, आम्ही इथेच राहणार आहोत. माझे वडील ५० वर्ष इथले रहिवासी होते‌. शिवसेनेचा विजय पक्का असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी परिक्षित मांजरेकर, दिनानाथ नाईक, सत्यवान बांदेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.