
मंडणगड ( दि. 17):- देव्हारे विभागाचे विभाप्रमुख संजीव येसावरे यांची शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. दही हांडी उत्सावाचे निमीत्ताने देव्हारे येथे आयोजीत कार्यक्रमात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी येसावरे यांना नियुक्तीचे पत्र देऊन या संदर्भातील घोषणा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर दीपक मालुसरे, संजय शेडगे, अस्मिता केंद्रे, विनोद जाधव, योगेश जाधव, इरफान बुरोंडकर, सिध्देश देशपांडे यांच्यासह देव्हारे येथील शिवसैनीक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीबद्दल संजीव येसावरे यांच्या तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.