
सावंतवाडी : सालईवाडा येथे हिंदू आणि मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून या दोन्ही समाजातील तरुणांनी सलोख्याचा संदेश दिला आहे.
सालईवाडा भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने 17 दिवस गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. आज संकष्टी निमित्ताने गणेशभक्त संजय वेंगुर्लेकर यांचा मुलगा ऋषी वेंगुर्लेकर दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांनी बाप्पाला 1 हजार 111 मोदकांचा नैवेद्य अर्पण केला. या मंडळाच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. 17 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्व धार्मिक विधी पार पडले जातात. या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश दिला गेला आहे.