संजय रावराणे यांचा मे. कौस्तुभ रावराणे मित्रमंडळाकडून सत्कार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 18, 2023 20:26 PM
views 167  views

वैभववाडी : वैभववाडी रोटरी क्लब तालुका अध्यक्ष पदी निवड झालेल्या संजय रावराणे यांचा शहीद मेजर कौस्तुभ रावराणे मित्र मंडळ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचा नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यामध्ये रावराणे यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

     सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे संजय रावराणे यांची रोटरी कल्बच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. श्री.रावराणे यांनी रोटरीच्या  सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती.आता त्यांना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. या निवडीनंतर त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.या निवडीबद्दल शहीद मेजर कौस्तुभ रावराणे मित्र मंडळाने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय रावराणे, सुभाष रावराणे, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे,विश्राम रावराणे, सुधीर नकाशे, प्राचार्य डॉ सीएस काकडे, रत्नाकर कदम, नरेंद्र कोलते, उत्तम सुतार, गजानन पाटील, उदय सावंत, सतिश रावराणे, सचिन सावंत आदी उपस्थित होते.