
कणकवली : श्री 420 संजय राऊत ह्याने खोटे नाटे आरोप किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर केले होते. त्या बाबत न्यायलयाने पंधरा दिवसाची शिक्षा ठोठावली आणि दंड भरून घेतला. हा भामटा झाकणझूल्या सकाळी उठून जे खोटे आरोप करतो त्यात काही तथ्य नसत. हे आज पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. माझा अशिल संजय राऊतला अटक करू नका असं त्यांचा वकील न्यायालयासमोर हात जोडून गिडगीडत होता. म्हणजे राऊत किती भित्रा आहे. हे जनतेने पाहिले आहे. संजय राऊतची नाटक आता महाराष्ट्र ओळखायला लागला आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतचा समाचार घेतला. ते म्हणले, संजय राऊत ला ह्याचे घरचे गांभीर्यानी घेत नाहीत. जनतेने किती गांभीर्याने ह्यायचं ह्याचा विचार करावा. असे आवाहन यावेळी करत ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे. आणि शहा, फडणवीस हे शिवरायांचे मावळे आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व हिरव्या सापांना निवडणुकीत राजकीय दृष्ठा गाडून निवडणुकीत पराभव करून छत्रपतींचा भगवा विधान सभेवर लावणार असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मी नाही त्यातली कडी लावा आतली हा चित्रपट संजय राऊत ने काढावा. ह्यात लागणारे सगळे गुण राऊत मध्ये आहेत. आरे कॉलनीत काढलेल्या तुझ्या रशियन पॉर्न फिल्म माझ्या कडे आहेत. दाखवण्यासाठी आम्हाला तारखा जाहीर कराव्या लागतील. अमित शहा साहेब छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत. मातोश्रीचा वांग्या भाई कोण तिसऱ्या माळाव्यार राहतो त्याचा तू पहिला विचार कर. तुझ्या मालकाला हिम्मत असेल तर निवडणुकीच्या मैदानात आघाडीच्या कुबड्या न घेता एकटं यायला सांग. मग भाजप कशी असते ते दाखवू. धर्मवीर आनंद दिघे साहेब जिवंत असताना त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणारा संजय राऊत होता. दिघे साहेबांचे नाव घेण्याची लायकी ह्याची नाही. यानेच तेव्हा दिघे यांच्या साहेबांविरुध कटकारस्थाने केली. पहिल्या चित्रपटात मुलाखत घेताना दाखवला तो हाच आहे. यांची लायकीच नाही दिघे साहेबांचे नाव घेण्याची. स्व. बाळासाहेब देव होते आणि आहेतच त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस धर्म योद्धा आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्या श्री 420 संजय राऊत जो बेल वर बाहेर आहे. ह्याची पात्रता आहेत का ? असा सवालही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.