संजय पडतेंना बढती, जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी

रूपेश राऊळ सावंतवाडी विधानसभा प्रमुख
Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2024 05:21 AM
views 729  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे.ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी  बाबुराव धुरी (सावंतवाडी विधानसभा आणि कुडाळ तालुका) यांची तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदी रुपेश राऊळ (सावंतवाडी , दोडामार्ग व वेंगुर्ले तालुके) यांची निवड करण्यात आली आहे. 

तर वेंगुर्लेची सुकन्या नरसुले यांची विधानसभा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. बाबुराव धुरी हे दोडामार्ग येथील उपजिल्हाप्रमुख या पदावर होते. त्यांना बढती देऊन थेट जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर रुपेश राऊळ हे सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी होते. त्यांना सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी बढती देण्यात आले आहे. रुपेश राऊळ हे गेली बारा वर्षे सावंतवाडी तालुकाप्रमुख म्हणून काम करत होते. तर बाबुरव धुरी हे प्रथम दोडामार्ग तालुकाप्रमुख,त्यानंतर उपजिल्हाप्रमुख पदावर काम करत होते.  रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी हे दोघेही पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते यांना सहसंपर्कप्रमुख पदी  (सावंतवाडी, दोडामार्ग , वेंगुर्ले आणि कुडाळ तालुका) बढती देण्यात आली आहे. ते जिल्हाप्रमुख पदी काम करत होते

सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुखपदी  कालिदास कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. हे पद मुंबई मनपाचे माजी नगरसेवक शैलेश परब यांच्याकडे होते. त्यांना अंधेरी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा महिला संघटकपदी वेंगुर्ले येथील सौ.सुकन्या

 नरसुले (सावंतवाडी विधानसभा).यांना संधी देण्यात आली आहे.त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. विधानसभा मतदारसंघ निवडणुकांसाठी हा फेरबदल व खांदेपालट करण्यात आला आहे.महायुतीला टक्कर देऊन पून्हा येथील शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.