वेंगुर्ला ST कामगार सेनेच्या अध्यक्षपदी संजय गावडे

सचिव पदी विजय सोनवणे
Edited by:
Published on: January 11, 2024 11:08 AM
views 131  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला एसटी कामगार सेनेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख पदी संजय गावडे यांची फेर निवड एकमताने करण्यात आली आहे. तर सचिव पदी विजय सोनवणे यांची निवड करण्यात आली. 

वेंगुर्ला एसटी कामगार सेनेची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात तालुका प्रमुख पदी संजय गावडे, सचिव पदी विजय सोनावणे, कार्याध्यक्ष पदी निखिल निकम, उपाध्यक्ष पदी मकरंद होळकर व ऐ.आय.भाटकर, सह सचिव पदी वी. आर. सोनवणे, सह खजिनदार पदी श्री. बागायतकर, खजिनदारपदी विवेक नवार, महिला संघटक पदी धनश्री तांडेल आणि निहारिका होळकर, कायदेशीर सल्लागार पदी ऍड जी. जी. टांककर, विभागीय सदस्य पदी मार्टिन डिसोझा, एस. ए. काझी, उदय चिंचकर तर  सदस्य पदी  अभि परब, सागर सावंत, राहुल आरोलकर, बंड्या राऊळ, सदाशिव राणे, बी ऐन सातार्डेकर, स्वामिनी सनगर, श्री चोपडेकर, दामोदर सदरकर यांची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीचे जिल्हा प्रमुख अनुप नाईक तसेच जिल्हा सचिव आबा धुरी यांनी अभिनंदन केले.

एसटी कामगार सेना एक परिवार आहे. सर्व मिळून काम करायचं, सर्व कामगारांचे प्रश्न सोडवायचे, एकजूट राहायचं अशी शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच कार्यकारणी झाल्यानंतर लगेच कामगार प्रश्न घेऊन आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांची भेट घेण्यात आली. यावेळी विविध प्रश्न मार्गी लावण्यात आले. तसेच आगर व्यवस्थापक कुंभार हे आगार व्यवस्थापक या पदाची परीक्षा पास झाल्याने त्यांना पुढील वाटचालीस  देण्यात आल्या.