
देवगड : संजय गांधी निराधार योजना देवगड तालुका समितीची बैठक तहसिलदार संकेत यमगर यांच्या उपस्थितीत तहसिलदार देवगड यांच्या दालनात पार पडली. यासभेत एकूण ७१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
यामध्ये संजय गांधी विधवा लाभार्थी यांचे २७ प्रस्ताव, परितक्त्या ०१, अविवाहित ०१, दिव्यांग २४, अनाथ ०१, श्रावणबाळ ११ व वृध्दापकाळ ०६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी समिती सदस्य वैभव करंगुटकर, सुहास राणे, शैलेश लोके, संतोष जंगले, संजना आळवे, नगर पंचायत मुख्याधिकारी सूरज कांबळे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, अका कैलास गावडे, शिवराज चव्हाण, महसूल सहाय्यक प्रदिप कदम, ऑपरेटर प्राजक्ता चिंदरकर उपस्थित होते.