माणगाव येथील संजय धुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Edited by: भरत केसरकर
Published on: November 26, 2023 10:39 AM
views 1502  views

कुडाळ : माणगाव हायस्कुल समोरील संजय धुरी (वय -36) या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. काल रात्री त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला माणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर पहाटे साडेतीन वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने माणगावहून कुडाळ येथील खाजगी रुग्ण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच हृदयविकाराच्या तीव्रतेने त्याचे निधन झाले.कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टर तपासणी करून त्याचे निधन झाल्याचे घोषित केले. संजय हा एक हरहुन्नरी आणी कष्टाळू युवक होता.

माणगाव हायस्कूल समोर त्याचे घर असून वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. घरी आई,पत्नी,भाऊ असा त्याचा परिवार आहे.छोटी छोटी काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता  अतिशय कष्टकरी असलेल्या संजय च्या या निधनाची बातमी माणगाव खोऱ्यात समजतात त्याच्या मित्रपरिवारात एकच सन्नाटा पसरला.त्याच्या निधनानंतर मित्रपरिवाराने धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.