सावंतवाडीत स्वच्छता व्यवस्थेला बळ

नगरपरिषदेला अत्याधुनिक सक्शन व्हॅन प्राप्त
Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2026 20:26 PM
views 21  views

सावंतवाडी : शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेत अत्याधुनिक सक्शन व्हॅन प्राप्त झाली आहे. नाले तसेच सेप्टिक टॅंक सफाईसाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून स्वच्छ व सुंदर शहरासह नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे.


सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागत होत्या. मात्र, आता या नवीन वाहनामुळे कामे जलद, सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने करता येणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील साचलेले पाणी, गटारातील घाण आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असून स्वच्छ व निरोगी सावंतवाडीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.