
वैभववाडी : शहरातील जिल्हा बँकेसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने नेल्याची घटना घडली होती. मात्र ही चोरी नसून गैरसमजातून घडलेला प्रकार असल्याचे पुढे स्पष्ट झाले.
कुंभवडे येथील विक्रांत सावंत यांनी आपली दुचाकी दुपारी जिल्हा बँकेसमोर उभी केली होती. त्याच ठिकाणी कुसूर येथील एका व्यक्तीची त्याच मॉडेलची दुसरी दुचाकी उभी होती. गाडी एकसारखी असल्याने संबंधित व्यक्तीने चुकून सावंत यांची दुचाकी आपली समजून नेली.
दरम्यान, दुचाकी न दिसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली.त्यानंतर हा गैरसमज लक्षात आला. संबंधित दोघांनीही सायंकाळी वैभववाडी पोलिस ठाण्यात हजर राहून आपापल्या दुचाकी ताब्यात घेतल्या.या घटनेमुळे शहरात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.











