
मालवण : मालवण तालुक्यातील वराड गावातील सावरवाड येथे "रुद्रनाद फाऊंडेशन" या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारी यांनी धार्मिकतेच्या नावाखाली केलेली अघोरी कृत्ये, बेकायदेशिर व नियमबाह्य शिवलिंगाची स्थापना करुन ग्रामस्थांकडुन व भक्तांकडुन पैसे उकळणे, ग्रामस्थांच्या धार्मिक भावना भडकविणे, गांवातील सार्वजनिक शांतता व एकोपा यात तेढ निर्माण करुन अनधिकृतरित्या करत असलेल्या कृत्यांबाबत वराड गावातील श्री देव वेताळ ट्रस्ट पदाधिकारी व वराड ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांच्याडे तक्रार निवेदन दिले. याबाबत जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडे ही निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तसेच योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
श्री देव वेताळ ट्रस्ट कमिटी गावकर पालटदार ग्रामस्थ तसेच सुमारे 1200 पेक्षा जास्त ग्रामस्थ यांच्या सह्या असलेले तक्रार निवेदन आमदार निलेश राणे यांना दिले. रुद्रनाद फाऊंडेशन" या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारी यांनी धार्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांचा पाढा उपस्थित ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांच्यासमोर वाचला. रात्रीच्या वेळी गोवा राज्यातून अनेक महिला पुरुष याठिकाणी येतात. पहाटे प्रयत्न काहीतरी सुरु असते. ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना विनंती करू तात्काळ या सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून तत्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार निलेश राणे यांच्या या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.











