दोडामार्ग येथे तालुकास्तरीय ‘आशा दिन’ उत्साहात साजरा होणार

Edited by: लवू परब
Published on: March 27, 2026 20:34 PM
views 16  views

दोडामार्ग : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सभागृहात सोमवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता तालुकास्तरीय ‘आशा दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने साजरा केला जातो.