
संगमेश्वर : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी तामनाळे येथील स्वयंभू रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या कॉजवेसाठी केले २५ लाख मंजूर केलेत. तामनाळे येथे प्रसिध्द स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे. त्या लगत एक मोठा नाला आहे. त्याचबरोबर या गावातील ५०% शेती ही या नाल्या पलिकडे आहे. ४० वर्षांपूर्वी, ही अडचण लक्षात घेऊन या गावचे तत्कालीन सरपंच तानाजी गिडये यांचे मागणीनुसार माजी आमदार कै. मामी भुवड यांचे प्रयत्नाने माजी बांधकाम मंत्री जगन्नाथ जाधव यांनी लोखंडी फुट ब्रीज बनवला होता. त्यामुळे या गावातील लोकांची मोठी समस्या दूर झाली होती.
४० वर्षापुर्वी झालेला हा लोखंडी साकव गेली ५ / ६ वर्षे नादुरुस्त होता. गेली तीन वर्षे या साकवावर ग्रामस्थ श्रमदानातून लाकडी साकव टाकून ये जा करत आहेत.
ही समस्या सोडविण्यासाठी हुमणे गुरूजी यांनी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. परंतू यश मिळाले नाही. चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचे कार्यप्रणालीवर खुष होऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली दोनशे अडीचशे लोकांच्या साक्षीने हा काॅजवे, मंदिराकडे जाणारा 300 मीटर अपूर्ण रस्ता व हा रस्ता डांबरीकरण या तीन कामाची मांगणी करून आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. मे महिन्यामध्ये झालेल्या हुमणे परिवार कुळदेवता प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या
मा.आमदार शेखरजी निकम यांचेकडे श्री. हुमणे गुरूजी आणि ग्रामस्थांनी या तिन्ही कामाची आमदारांकडे पुन्हा मागणी केली. त्याचक्षणी आमदार शेखर निकम यानी ही तिन्ही कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. आमदार श्री निकम यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गेल्या महिन्यात या तीन कामापैकी रामेश्वर मंदिर काॅजवेसाठी आमदार शेखर निकम यानी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
आमदार शेखर निकम यानी ही लोकांची समस्या दूर केल्याबद्दल हुमणे गुरूजी, माजी सरपंच संतोष हुमणे, चंद्रकांत गराटे, संतोष बडबे, अशोक धनावडे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष बाबाजी गिडये, सचिव सहदेव गिडये, उपाध्यक्ष धोंडू गिडये , कृष्णा गिडये, गजानन घाणेकर, संदिप धनावडे व गावप्रमुख रघुनाथ गिडये यानी आमदार शेखर निकम सर यांचे अभिनंदन केले.