
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाचे प्रथम तीन सरसंघचालक यांच्या जीवनावर आधारित "संघ गंगा के तीन भगीरथ" हे दोन अंकी हृदयस्पर्शी हिंदी नाटक रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, या नाटकाचा प्रयोग मराठा मंडळ हॉल कुडाळ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हे नाटक विनाशुल्क अजून सर्वांनी ह्या नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लोढा ग्रुप प्रस्तुत,ताराराणी फाऊंडेशन, पुणे निर्मित 'संघ गंगा के तीन भगीरथ' हे नाटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार,श्री माधव सदाशिव गोळवलकर (श्री गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारीत दोन अंकी हृदयस्पर्शी हिंदी नाटक असून,या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे यांचे असून, दिग्दर्शन संजय पेंडसे यांचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं नाटक मुंबई, नागपूर, वर्धा, खामगांव, चिखली, बुलढाणा, नाशिक, अंमळनेर, जळगाव, धुळे, पुणे आणि रत्नागिरीतील अभूतपूर्व यशानंतर सिंधुदुर्गातील रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचा प्रयोग कुडाळ येथील मराठमंडळ सभागृहात रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या नाटकासाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.