ओटवणे भजन स्पर्धेत सांगेलीचं सनामदेव प्रासादीक भजन मंडळ प्रथम..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 05, 2023 10:59 AM
views 93  views

सावंतावडी : ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेली सनामदेव प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा खेमराज सनाम ) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत पिंगुळी येथील श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा रूपेश यमकर) व्दितीय क्रमांक तर कलंबिस्त येथील श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा संतोष धर्णे ) तृतीय क्रमांक पटकाविला.

भजन स्पर्धेचे उद्घाटन सरपंच आत्माराम गावकर, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, पपू सावंत, सोनू दळवी, रवींद्र गावकर, अण्णा मळेकर, बाबाजी गावकर, बंड्या केळकर, उमेश गावकर, कृष्णा  देवळी, गुरू कोटकर, संजू कविटकर, मंगेश चिले, महेश परब, बाळकृष्ण भगत, मिलिंद म्हापसेकर, गुंडू जाधव, रमेश गावकर, स्पर्धेचे परीक्षक कृष्णा राऊळ, आनंद मोरये, स्वप्निल म्हापसेकर, विठू गावकर, विठ्ठल गावकर, समिक्षा गावकर, मनाली गावकर, राजाराम वर्णेकर, तुकाराम गावकर, एकनाथ गावकर, बाळा गावकर, बबलू गावकर, बाबा मळेकर, प्रकाश पनासे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीलप्रमाणे उत्कृष्ट गायक रूपेश यमकर, श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ ( पिंगुळी ), उत्कृष्ट तबला मिहीर नाईक, विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले (आंदुर्ले ), उत्कृष्ट पखवाज दीपक मेस्त्री, प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादीक भजन मंडळ  ( कुडाळ ) या भजन यापुढे दरवर्षी भजन स्पर्धा

यावेळी राजन पोकळे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने रवळनाथ मंदिरात श्रावणात दरवर्षी भजन स्पर्धा घेण्याचे यावेळी जाहीर केले. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले होते. ओटवणे गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत साटम महाराज प्रासादीक भजन मंडळ (निरवडे), श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ (सातुळी),श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ (वेंगुर्ले), रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पाडलोस), श्री देव सावंत वस प्रासादीक भजन मंडळ (इन्सुली) यांनीही सुश्राव्य  भजन सादर करून भजन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी ओटवणे माजी उपसरपंच बाबाजी गावकर, फुगडी गीतकार प्रभावती गवळी, माजी सैनिक संतोष गवळी, शिवसेना विभागप्रमुख उमेश गावकर, शाखाप्रमुख संजय गावडे, मंगेश चिले, स्पर्धेचे परीक्षक कृष्णा राऊळ, आनंद मोर्ये, स्वप्निल म्हापसेकर, बबलू बांधकर, मंगेश गावकर आकाश मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७००० रुपये, ५००० रूपये,  ३००० रूपये व सन्मानचिन्ह, उकृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक यांना तसेच स्पर्धेत सहभागी १० संघांना प्रत्येकी १००० रुपयाचे पारीतोषिक सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार महेश चव्हाण, सुत्रसंचालन प्रसिध्द बुवा संजय गावडे यांनी तर आभार उमेश गावकर यांनी मानले.