
सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सोलार सारखी महत्वपूर्ण योजना जाहीर केली. येणाऱ्या काळात वीजेची समस्या अजून जटील होणार आहे. विजेची मागणी बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा जि.प.च्या अकरा शाळांना 'ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर' ही योजना राबवीली जाणार आहे अशी माहिती भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी दिली. वाढदिवसाच्या निमीत्ताने त्यांनी या संकल्पनेचा शुभारंभ केला.
ते म्हणाले, या संकल्पनेमुळे सोलार विजेवर लाईट नसेल तेव्हा या शाळांमध्ये लाईट असेल जी सोलारवर चालणार आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर सिस्टमवर सावंतवाडी तालुक्यातील अकरा शाळांची निवड आम्ही केली आहे. लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते याच लोकार्पण केल जाईल. यामुळे शाळांच्या वीजबिलाचा खर्चही कमी होईल. आमच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर आम्ही हा प्रकल्प राबवित आहोत अशी माहिती संदीप गावडे यांनी दिली. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, भाजप किसान मोर्चाचे अजय सावंत, दादा परब, आदी उपस्थित होते.