
दोडामार्ग : राष्ट्रवादीचे व्हीजेएनटी तालुकाध्यक्ष व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी पुन्हा एकदा भगवा झेंडा हाती घेत खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शनिवारी दोडामार्ग येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत मला हवा तसा काम करायला स्कोप मिळत नसल्याने आपण स्वगृही परतलो असून माझ्या भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी बाळासाहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत काम करणार आहे.
जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, बाळा गावडे, विधानसभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत, रुची राऊत, जानवी सावंत यांसह उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, माजी नगराध्यक्षा सौ. लीना कुबल, श्रेयाली गवस, शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी, संजय नाईक, मिलिंद नाईक, संतोष मोर्ये, विजय जाधव, अण्णा शिरोडकर, राजू धरणे, संदेश राणे, ऑलवीन लोबो, दशरथ मोरजकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या भागाचा सर्वांगीण विकास हाच माझा समाज कार्याचा अजेंडा असून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास संदेश वरक यांनी व्यक्त केलाय.