ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संदेश पारकर, संजय पडते

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 06, 2023 15:33 PM
views 568  views

कणकवली :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, जिल्हाप्रमुख - संदेश पारकर (कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण), संजय पडते (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ) असे दोन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत. 

तसेच विधानसभाप्रमुख - सतीश सावंत (कणकवली विधानसभा), विधानसभा संपर्कप्रमुख अतुल - रावराणे (कणकवली विधानसभा) यांनाही पक्षाची जबाबदारी देण्यात आली. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.