कोटकामतेवासींय संदेश पारकरांसोबत !

Edited by:
Published on: November 12, 2024 17:13 PM
views 382  views

देवगड : भाजप पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांचा पराभव म्हणजे काय दगडावरची रेघ आहे हा संकल्प करून कोटकामते भरड वाडी येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात  संदेश पारकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

आपल्या भागाचा विकास हा सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा संदेश पारकरच करू शकतात त्यामुळे कोटकामत्ते भरडवाडी हे संदेशभाई पारकर यांच्या पाठीशी राहणार असा निश्चय करण्यात आला. यावेळी प्रवेश करणाऱ्यांमध्ये सत्यवान चुनेकर, संतोष घाडीगावकर, राजेंद्र घाडीगावकर, मंगेश धोपटे, सुरेश घाडीगावकर, दीपक घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, आबा घाडीगावकर, केशव चुनेकर, मंगेश घाडीगांवकर, निलेश घाडीगांवकर, सुरेश घाडीगांवकर, भगवान घाडीगावकर, प्रसाद तेली, मारुती तांबे, पुष्पांजली घाडीगावकर, विवेक मिसाळे, संदीप खुडपकर, संदीप मिशाळे, संजय घाडीगावकर, संजय कुडपकर, मुकुंद कामतेकर आदींनी केला प्रदेश..यावेळी त्यांच्या सोबत गणेश गावकर, परेश रुमडे,संतोष दळवी, संजय वाळके,उपस्थित होते.