संदेश पारकरांचा नाडणमध्ये घरोघरी प्रचार

Edited by:
Published on: November 07, 2024 13:51 PM
views 187  views

कणकवली : नाडण गावात घरोघरी प्रचारादरम्यान संदेश पारकर यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहा वर्ष येथील स्थानिक आमदार असून देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न का सोडवला नाही, तसेच या गावातील एस.टी.बस स्थानकांचा विकास का केला नाही. असा भावना नागरिकच प्रचारादरम्यान उपास्थित करत असल्याचे पारकर समर्थक सांगत आहेत. त्यामुळे या विधानसभेला संदेश पारकर यांच्या पाठीशी नाडण येथील जनता ठामपणे राहणार असा निश्चय करण्यात आला आहे. 

यावेळी पारकर यांच्यासोबत वाडा सरपंच सुनील जाधव, विभाग प्रमुख संदीप डोळकर, सुनील महाडिक, शशांक तावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.