
कणकवली : गेल्या१० वर्षात येथील विद्यमान स्थानिक आमदाराने कोणता विकास केला, कोणत्या स्थानिक मुलांना रोजगार मिळू शकला काय असा सवाल उपस्थित करत पुढच्या 5 वर्षात आपण लोकांभिमुख विकास करणा, स्थानिकाना रोजगार देणार असे अभिवचन देत भूलथापा मारणाऱ्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी ग्वाही पारकर यांच्या प्रचारात सहभागी कार्यकर्ते व स्थानिकांनी दिली. कणकवली तालुक्यातील शेरपे आणि नडगिवे गावात संदेश पारकर यांच्या प्रचारादरम्यान झालेल्या प्रचार बेठका व दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
सर्वसामान्य जनतेच्या एका हाकेला धावून येणाऱ्या संदेश पारकर यांना मतदान करण्याचा संकल्प यावेळी केल्याचेही सांगण्यात आले. शिवसेना महाविकास आघाडीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे आणि विजयाची मिरवणूक आपल्याला या ठिकाणी उधळायची आहे, यासाठी मोठया संख्येने उबाठा शिवसेना उमेदवार ला मतदान करा, असे आवाहन संदेश पारकर यांनी केला. यावेळी त्याच्यासोबत बाळा राऊळ, गणेश कर्ले, सुधाकर कर्ले, विलास कलगुटकर, सुनील कर्ले , बाळू सुतार, मंगेश मांजरेकर, वैभव कांबळी, शिवाजी गुंडये, बाळू मण्यार, सुधाकर मण्यार, प्रवीण वरुणकर आणि दोन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.