येणाऱ्या काळात अधिकाधिक कलाकार घडतील : संदीप गावडे

ओंकार कलामंचला दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2024 14:22 PM
views 69  views

सावंतवाडी : ओंकार कला मंचाच्या माध्यमातून मुलांना घडविण्याचे काम होते. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात अधिकाधिक कलाकारांना यामुळे संधी मिळेल असा विश्वास भाजप माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी व्यक्त केला. सावंतवाडीतील ओंकार कलामंच डान्स अकॅडमीच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डान्स सावंतवाडी डान्स या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


भाजप माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे पुरस्कृत सावंतवाडीतील ओंकार कलामंच डान्स अकॅडमीच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त डान्स सावंतवाडी डान्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऐतिहासीकदृष्ट्या महत्व लाभलेल्या सावंतवाडी शहराला संस्थानकालापासून मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. हा ठेवा कायम ठेवण्याचे काम सावंतवाडी ओंकार कलामंचाच्या माध्यमातून होत आहे. हे कौतुकास्पद आहे, मत सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केले. नृत्याच्या माध्यमातून आता करीयरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत तर दुसरीकडे मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वॉर्मअपकडे वळविण्याच्या दृष्टीने पालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे ही त्यांनी सांगितले. 

यावेळी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलिस उपनिरिक्षक प्रदीप नरळे, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सुपर अभिनव सायन्स अकॅडमीचे विलास पोळ, युवा नेते संदीप गावडे, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, डान्स अकॅडमीचे प्रमुख अनिकेत आसोलकर, तिलारी बांधकामचे अधिकारी राजेंद्र पवार, नृत्य दिग्दर्शक मंदार काळे आदी उपस्थित होते.

     

यावेळी श्री.निकम म्हणाले, सद्यस्थितीत सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत ओंकार कलामंचाच्या माध्यमातून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा घेण्यात आलेला निर्णय कौतूकास्पद आहे. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे ओंकार कलामंचच्या माध्यमातून सावंतवाडीचा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. श्री. सांळुखे म्हणाले, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य महोत्सवाच्या माध्यमाधून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे. संदीप गावडे म्हणाले, या ठिकाणी ओंकार कला मंचाच्या माध्यमातून मुलांना घडविण्याचे काम होते हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिकाधिक कलाकारांना संधी मिळावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. डान्स ॲकेडमी व मंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमास आपले त्यांना निश्चितच सहकार्य असेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पांचाळ यांनी केले. यानंतर राज्यस्तरीय सोलो आणि ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. यात राज्यभरातून अनेक कलाकार आणि डान्स ग्रुप सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किसन धोत्रे, अभिषेक लाखे, चैतन्य सावंत, दीपेश शिंदे, हेमंत पांगम सचिन मोरजकर, आनंद काष्टे, नारायण पेंडुरकर, रोहित पाळणी, साईनाथ हनपाडे, रूत्वीक पाटकर, परेश सावंत, रोहन मल्हार,स्टेला डान्टस,संहीता गावडे, पुजा पारधी,सोनाली बरागडे, स्नेहा शिरसाट, ओम टेंबकर,स्वरूप कासार, रसिका धुरी, नितेश देसाई, भुवन नाईक, मृणाल पावस्कर, खुशी वेंगुर्लेकर, अमित आसोलकर, अमरेश आसोलकरआदींनी परिश्रम घेतले.