
सावंतवाडी : नेमळे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आज संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू असे श्री. गावडे म्हणाले. तसेच नेमळे गावच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेले माजी सरपंच विनोद राऊळ यांचे देखील गावडे यांनी आभार मानले. यावेळी शक्तिकेंद्र प्रमुख गौरेश मुळीक, बुथ अध्यक्ष नंदू राऊळ तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.










