जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप गावडे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 07, 2023 19:10 PM
views 250  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार संदीप गावडे यांची शुक्रवारी बहुमताने निवड करण्यात आली. तसेच सनिवपदी लवू म्हाडेश्वर ,उपाध्यक्षपदी विनोद परब, खजिनदार गिरिष परब, सहसचीव सतीश हरमलकर व कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

      सिंधुदुर्गनगरी जिल्हा गुख्यालय पत्रकार संघाची २०२३ ते २०२५ सालासाठी द्वीवार्षिक निवडणूक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रकार कक्षामध्ये निवडणूक निरिक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य राजन नाईक व संतोष राऊळ यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सुरुवातीला त्यांनी निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने घेण्यात येणार याची माहिती दिली व निवडणूक बिनविरोध व्हावी असे सूचितं केले. मात्र अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संदीप गावडे व दत्तप्रसाद वालावलकर या दोघांमध्ये निवडणूक झाली. यावेळी संदीप गावडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. त्यानंतर निवडणूक निरिक्षकांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. त्याचबरोबर नुतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खड़पकर,मुख्यालय पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, लवू म्हाडेश्वर, नंदकुमार आयरे, विनोद परब, सतीश हरमलकर, गिरिष परब, तेजस्वी काळसेकर, मनोज वारंग, विनोद दळवी आदी गुख्यालय पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य तसेच प्रसाद पाताडे आदी पत्रकार उपस्थित होते.

    जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड झाल्यानंतर निवडणूक निरिक्षक राजन नाईक व संतोष राऊळ यांनी अध्यक्ष संदीप गावडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच गावळते अध्यक्ष संजय वालावलकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गुख्यालय पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष संदीप गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा मुख्यालय पत्रकार संघागार्फत सर्व पत्रकारांना एकत्रीत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. तसेच सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून मुख्यालय पत्रकार संघ जिल्हयात आदर्शवत करण्याचा गनोदय व्यक्त केला. या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी सुरुवातीला गावळते अध्यक्ष संजय वालावलकर यांनी निवडणूक निरिक्षकांचे स्वागत केले. तर नुतन सचिव लवू म्हाडेश्वर यांनी आभार मानले.