केसरी-धनगरवाडीची संदीप गावडे यांनी भागविली तहान !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2023 18:53 PM
views 122  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेल्या केसरी आलाठी धनगरवाडीसाठी स्वतंत्र बोअरवेल आणि पाण्याची टाकीच्या कामाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले . शासनाच्या सर्व विकासकामे जलदगतीने राबविण्यात केसरी फणसवडे ग्रामपंचायत अग्रेसर ठरत आहे. लवकरच केसरी आलाठी धनगरवाडी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी होईल व येथील महिला वर्गाची होणारी परवड थांबेल असं मत श्री. गावडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी केसरी-फणसवडे सरपंच सौ. स्नेहलता कासले , उपसरपंच संदिप पाटील , ग्रा. पं . सदस्य भिवा सावंत , गुरुनाथ कसले , देवसू-दाणोली उपसरपंच धोंडीराम जंगले , भरत गोरे , सुशांत नाईक , गंगाराम जंगले , चौंडू पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .