
सावंतवाडी : विलवडेमधली वाडी रस्त्याचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. निधी मंजुरी दिल्यानंतर सरपंच प्रकाश दळवी व त्यांच्या टीमने तात्काळ कागदपत्रांची पूर्तता केली. येणाऱ्या काळात विलवडे गावातील एकही रस्ता मातीचा दिसणार नाही हे लक्ष्य समोर ठेवल असल्याच वक्तव्य संदीप गावडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, शिल्पा धर्णे, सानिका दळवी, गणेश दळवी, अपर्णा दळवी, कृष्णाजी (दादा) सावंत, मोहनजी दळवी, प्रदीपजी दळवी, संतोषजी दळवी, आत्मारामजी दळवी सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर व सर्व सहकारी उपस्थित होते. यासाठी विशेष सहकार्य आमचे बाबुराव दळवी (देवकार) यांचे लाभले.