जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सांगेलीच्या सनामदेव प्रासादीक मंडळाचा प्रथम क्रमांक

सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 19:13 PM
views 47  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेलीच्या सनामदेव प्रासादीक भजन मंडळाने सांगेली ( बुवा खेमराज सनाम ) प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पिंगुळीच्या श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा रूपेश यमकर ) द्वितीय क्रमांक, तांबुळीच्या स्वरधारा प्रासादीक भजन मंडळाने ( बुवा अमित तांबुळकर ) तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ म्हणून कलंबिस्तच्या श्री स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळाची ( बुवा संतोष धर्णे ) निवड करण्यात आली.

          

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे असून उकृष्ट गायक वैभव राणे (श्री देव सावंत वस प्रासादीक भजन मंडळ इन्सुली), हार्मोनियम वादक विशाल घोगळे (श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ मातोंड), तबला वादक - प्राजक्ता परब (सात पाटेकर प्रासादीक भजन मंडळ निरवडे), पखवाज वादक तुषार नागडे ( श्री विठ्ठल रखुमाई प्रासादीक भजन मंडळ आंदुर्ले), झांज - श्री देवी सातेरी प्रासादीक भजन मंडळ (मातोंड), कोरस गोठण प्रासादीक भजन मंडळ (वजराठ)

       

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी परीक्षक उमेश घाटकर, योगेश प्रभू, श्रीपाद चोडणकर, मंडळाचे अध्यक्ष अर्चित पोकळे, उपाध्यक्ष दिलीप राऊळ, सचिव तेजस टोपले,  खजिनदार शैलेश मेस्त्री, उपखजिनदार बिट्टू सुकी, बाबु इन्सुलकर -मेस्त्री,  उमेश माने, संतोष मुंज, शैलेश गौंडळकर, आनंद जाधव, मयूर सुभेदार, संतोष चराटकर बाळू कशाळीकर आदी उपस्थित होते.

          

यावेळी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना ७७७७ रुपये, ५५५५ रूपये, ३३३३ रूपये आणि उत्तेजनार्थ आणि  उकृष्ट गायक यांना प्रत्येकी २००० रुपये तर हार्मोनियम वादक, तबला वादक, पखवाज वादक, झांज कोरस यांना प्रत्येकी १००० रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या भजन स्पर्धेला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना  निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक बाबु इन्सुलकर -मेस्त्री यांनी  तर तृतीय पारितोषिक वैभव म्हापसेकर यांनी पुरस्कृत केले होते.