संविता आश्रमाला लायन्स क्लब, सावंतवाडीचा आधार!

जीवनावश्यक साहित्याचे केले वितरण
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 14, 2022 15:40 PM
views 240  views

सावंतवाडी : लायन्स क्लब, सावंतवाडीच्या वतीने संविता आश्रम पणदूर येथे जेवणासाठी लागणारे साहित्य अर्थात तांदूळ, नारळ, डाळ, तेल, गहू, वाटाणे, साखर, चहापावडर तसेच पॅन्ट, शर्ट्स, टीशर्ट, साड्या, लेडीज ड्रेसेस व इतर कपडे आदी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच आई-वडिलांच्या स्मरणार्थ क्लबचे अध्यक्ष विद्याधर तावडे यांच्याकडून सदर साहित्य भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ लायन गजानन नाईक, बाळासाहेब बोर्डेकर, राजन पोकळे, संतोष चोडणकर, संदेश परब, रवी स्वार, महेश पाटील, अशोक देसाई, अमेय पै, लायन सचिव अभिजीत पणदूरकर,

महिला लायन मोहिनी मंडगावकर, मेघना राऊळ व अध्यक्ष विद्याधर तावडे आदी हजर होते.