आरपीडीच्या मुख्याध्यापकपदी संप्रवी कशाळीकर

जगदीश धोंड यांची पिआरओ पदी निवड
Edited by:
Published on: March 02, 2025 13:35 PM
views 100  views

सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयच्या मुख्याध्यापिका म्हणून संप्रवी शंकर कशाळीकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य, व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. नुकतेच माजी मुख्याध्यापक जगदीश धोंड सेवानिवृत्त झाले असून त्यांची शिक्षण प्रसारक मंडळाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांनी जाहीर केले.

माजी मुख्याध्यापक श्री. धोंड यांच्यावर पीआरओ ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक च. मु. सावंत, सतीश बागवे, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक संजय पाटील, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके आदी उपस्थित होते. दरम्यान, संप्रवी शंकर कशाळीकर यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला आहे.