
सिंधुदुर्ग : प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मान्यता दिल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख यांचे ऐवजी अॅड. समीर वंजारी यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी याबाबतच पत्र समीर वंजारी यांना दिले आहे.