
वेंगुर्ले : रोटरी क्लब वेंगुर्ला कडून टीचर्स एक्सलन्सी अवॉर्ड मिळविल्याबाबदल मातोंड पेंढऱ्याची वाडी ग्रामस्थ पालक आणि माजी शिक्षकांकडून समीर तेंडोलकर यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यात मानाचा मानला जाणारा रोटरी टीचर्स एक्सलन्सी अवॉर्ड मातोंड पेंढऱ्याची वाडी शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक समीर तेंडोलकर याना मिळाल्याबद्दल शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सत्यवान बरकुटे, उपाध्यक्षा विनंती कोळेकर, मुख्याध्यापक श्रीम आजगावकर, तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक भाऊ आजगावकर, माजी शिक्षक श्री काळोजी, शाळेचे उपशिक्षक श्री शेळके यांच्या सहित शाळेचे पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत तेंडोलकर यांचा जाहीर सत्कार समारंभ पार पाडला.
यावेळी समीर तेंडोलकर यांचा शाळेप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या ओढीबद्दल आणि सरांच्या एकंदर शैक्षणिक कामकाजाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त केले गेले. तसेच त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक काम उत्तरोत्तर असेच वाढत राहण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.