
कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले. यावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, अच्युत वणवे, जनार्दन शेळके, प्रसाद राणे, तेजल हजारे आदी उपस्थित होते.