
सावंतवाडी : येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होममध्ये डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते वाडोस येथील महीमा म्हाडगूत या कॅन्सरग्रस्त गरजू महिलेला सामंत ट्रस्टतर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
महीमा म्हाडगूत यांना स्तनांचा कर्करोग असून त्यांची सद्या केमोथेरपी सुरु आहे. नजीकच्या काळात अशा अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे डॉ. परूळेकर यांनी 'कोकणससाद'ला सांगितले.