'सामाजिक बांधिलकी'ने घेतली टी.बी. ग्रस्तांची जबाबदारी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2025 16:44 PM
views 82  views

सावंतवाडी : 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान' ने 'प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान' या उपक्रमात सहभाग घेत पाच टी.बी. ग्रस्त रुग्णांना दत्तक घेतले आहे. या अभियानांतर्गत संस्थेने पुढील सहा महिन्यांसाठी या रुग्णांना पौष्टिक आहार पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक कार्य करणाऱ्या 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'समोर आरोग्य विभागाचे ए. एम. मोरस्कर यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी तात्काळ या प्रस्तावाला संमती दिली. या उपक्रमाचा भाग म्हणून पाच रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. रुग्णालयाचे अधिकारी आणि रुग्णांनी संस्थेच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे पदाधिकारी उपस्थित होते.