'सामाजिक बांधिलकी' कडून रामदास गवळीला जीवदान

Edited by: विनायक गावस
Published on: December 09, 2023 17:58 PM
views 112  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून रामदास गवळीला जीवदान दिले गेले.  कित्येक दिवस माठेवाडा आत्मेश्वर तळीकडे आजारी अवस्थेत पडून असलेला रामदास गवळी वय वर्ष 35 याची माहिती सामाजिक बांधिलकीला नंदू गावडे यांनी दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व संजय पेडणेकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस कर्मचारी पि.के कदम हे स्वतः ॲम्बुलन्स घेऊन दाखल झाले. हा रुग्ण कित्येक दिवस आजारी असल्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटली होती. सर्वप्रथम त्याला  स्वच्छ आंघोळ घालून तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये  दाखल करण्यात आले.  त्याची अवस्था फार गंभीर असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर अधिक उपचार डॉक्टरांकडून चालू आहेत. त्याचप्रमाणे त्याचे नातेवाईक कुडाळ येथे राहतात अशी माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पि के कदम त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या सेवाभावी कार्यासाठी सामाजिक बांधिलकीला मोलाचे सहकार्य सचिन गिरी, विशाल गिरी व मयूर आंचेकर यांनी केले.