सावर्डे विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Edited by: मनोज पवार
Published on: April 15, 2025 12:24 PM
views 178  views

सावर्डे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून अखंड भारत  देश प्रगतीपथावर  घेऊन जाण्याबरोबरच मजबूत व आदर्श लोकशाहीची मूलतत्त्वे जगासमोर ठेवली. या महामानवाच्या न्याय, समता व बंधुता या तत्वांचा व सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य  राजेंद्र वारे  यांनी व्यक्त केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दलितांचे उद्धारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य  विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर  यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन त्यांना अभिवादन केले.

 याप्रसंगी सिद्धी इंगळे, आराध्या थरवळ ,कृपा देडगे,नेहा जाधव  या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून दिली तर मनिकर्णिका गुडेकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.शिक्षक  मनोगतात संचिता कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे ओळख  विविध प्रसंगांचे विवेचन करून विद्यार्थ्यांना करून दिली.

सहाय्यक शिक्षिका श्वेता मोरे व संचिता कदम यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र अवघडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश दाते यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.