
सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त शिवसेना शाखेत अभिवादन करण्यात आले. शिवसैनिकांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, राजू कासकर, शब्बीर मणियार, निशांत तोरसकर आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.