कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांना अभिवादन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 22, 2025 11:28 AM
views 111  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे माजी केंद्रीय मंत्री तसेचं कोकण रेल्वे चे शिल्पकार स्वर्गीय प्रा.मधू दंडवते यांची १०१ वी जयंती आज सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा.मधू दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.

सावंतवाडी रेल्वे स्थानक येथील प्रा.मधू दंडवते जयंती कार्यक्रमात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यु लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, प्रमोद गावडे, साहील नाईक, सुभाष शिरसाठ, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर तसेचं रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी रेल्वे स्थानकास लवकरात लवकर प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली.