तुतारी परिसराच्या नूतनीकरनासंदर्भात साळगावकर यांच्या सूचना

ज्येष्ठ नागरिकांनी केली होती लक्ष घालण्याची विनंती
Edited by: विनायक गांवस
Published on: November 29, 2022 15:45 PM
views 215  views

सावंतवाडी : शहरातील निसर्ग व संस्कृतीत जोपासणारे स्वच्छ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.आज ते नगराध्यक्ष पदावर नसून सुद्धा आजही शहरातील नागरिक व तसेच ज्येष्ठ नागरिक, शहरातील अनेक समस्या घेऊन मोठ्या आशेने त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटतात.

   नगराध्यक्ष असताना मोती तलावावरील केशवसुत कट्ट्यावरच्या तुतारीची संकल्पना सत्यात उतरली व केशवसुत कट्ट्यावर भव्य अशी तुतारी उभारून केशवसुत कट्ट्याला एक नवी ओळख दिली.

   कालांतराने जीर्ण झालेल्या तुतारीचे पुन्हा नूतनीकरण करून मोठ्या थाटात शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते नूतन तुतारीचं  अनावरण करण्यात आलं होतं.

     सध्या स्थितीमध्ये तुतारीच्या आजूबाजूच्या परिसराची बैठक व्यवस्था व फ्लोरिंगचे  बांधकाम करण्यात येत आहे त्या कामामध्ये काही बदल व त्रुटी लक्षात घेऊन त्यामध्ये थोडाफार बदल करावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा एकदा साळगावकरांचे लक्ष वेधलं आहे.

    यांच्या विनंतीचा मान ठेवून साळगावकर यांनी केशवसुत कट्ट्याला आज भेट दिली त्यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी बँक कर्मचारी प्रदीप ढोरे उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मतानुसार थोडाफार बदल करावा, असे सुचवले त्यावेळी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी कुडपकर यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून बांधकामा विषयी  माहिती घेतली व त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार  काही समस्या असतील तर त्या दूर करा अशी विनंती त्यांनी सदर अधिकाऱ्यांना केली.

   तुतारी परिसराच्या नूतनीकरणासाठी  दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देणारे मा. दीपक भाई केसरकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.