
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावात अवैद्य दारू विक्री व चोरांचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी कुडासे सरपंच पूजा देसाई यांनी निवेदनाद्वारे दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे. कुडासे गावात दिवस रात्र बेसूमार गोवा बनवटीची अवैद्य दारू विक्री केली जात आहे. या दारूमुळे बऱ्याच जणांचे सौसार उध्वस्त झाले आहेत. बऱ्याच आमच्या आया बहिणी विधवा झाल्या आहेत. त्यामुळे ही खुले आम विकली जाणारी दारुवर बंदोबस्त करून कारवाई करा तसेच गावात चोऱ्यांचे ही प्रमाण वाढत आहे. त्याचाही तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी कुडासे सरपंच पूजा देसाई यांनी पोलिसांकडे केली आहे त्यांच्या सोबत सदस्य राजाराम देसाई, दिलीप कुडास्कर, वसंत गवस आदी उपस्तित होते.