साक्षी प्रभू आक्रमक.!

Edited by:
Published on: November 26, 2023 14:53 PM
views 451  views

देवगड : देवगड समुद्रकिनारी सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला ठरावाला उ.बा.ठा शिवसेना सदस्यांनी पाठींबा दिला परंतु भाजप सदस्य नगरसेवक यांनी विरोध करून विकास कामांत खोडा घातला, आपण यापूर्वी कोणत्याही हेतूने शिंदे सेनेत प्रवेश केला नव्हता विकास कामे एवढाच अजेंडा आपण घेऊन मी काम करीत आहे. आजपर्यंत कोणताही आर्थिक फायदा अथवा टक्केवारी साठी काम केल नसून,अथवा कुणाचे नगरसेवक पद वाचविण्यासाठी प्रवेश केला नाही. हे जनतेला ज्ञात आहे. यापूर्वीची आर्थिक गोळाबेरीज टक्केवारी याबाबत देवगड जामसंडे जनता ओळखून आहे. वॉटर एटीएम,गुरांचे टॅगिंग, कचरा जागेतील घोळ ही सर्व प्रकरणे देवगड मधील हुशार जनता ओळखून असल्याचा टोला नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकामधून लगावला.

प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की,देवगड जामसंडे नगरपंचयत हद्दीतील रेंगाळलेली विकासकामे तसेच पर्यटन दृष्ट्या महत्वाची विकास कामे ही सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावणे व देवगडचा सर्वांगीण विकास करणे या हेतूनेच मी२२ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. व त्या पासून आजमिती पर्यंत मी शिंदे शिवसेनेची नगराध्यक्षा म्हणून कार्यरत आहे.व शिंदे सेनेत प्रवेश केल्यावर खऱ्या अर्थांने विकास कामांना चालना मिळाली आहे.अशी प्रतिक्रिया देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत,शिक्षण मंत्री दीपक केसरकर व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. व त्यावेळी विक कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन आपणाला मिळाले व त्या अनुषंगाने नाम दीपक केसरकर यांनी पर्यटन विकास कामांतर्गत प्रभाग क्र ११ मध्ये विकास कामे प्रस्तावित केली.त्या कामाकरिता आवश्यक ते प्रस्ताव करण्याबाबत ठराव घेणे महत्वाचे होते व त्यावेळी आपण मांडलेल्या प्रस्तावाला ठरावाला उबठा शिवसेना सदस्यांनी पाठींबा दिला, परंतु भाजप सदस्य नगरसेवक यांनी विरोध करून विकास कामांत खोडा निर्माण केला असही त्या म्हणाल्या.