सकल मराठा समाज 'जबाब दो' आंदोलन छेडणार : ॲड. सुहास सावंत

Edited by:
Published on: September 03, 2023 20:16 PM
views 138  views

कुडाळ : जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर अमानुषपणे लाठी चार्जच्या केल्याच्या निषेधार्थ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा समाजाला प्रशासनाकडून मिळत असलेली वागणूक याच्या विरोधात ५ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर तर ६ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर 'जबाब दो' आंदोलन छेडले जाणार असल्याचे सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ॲड. सुहास सावंत यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कुडाळ मराठा समाज हॉल येथे सभेचे आयोजन केले होते सभा संपल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक ॲड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी सौ अर्चना घारे सिताराम गावडे, सुंदर सावंत, धीरज परब, सिद्धेश परब रूपाली पाटील दिलीप परब उपस्थित होते.

यावेळी सुहास सावंत यांनी सांगितले की जालनामध्ये जो मराठा समाजावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा अमानुष होता त्या ठिकाणी महिलांना सुद्धा सोडले गेले नाही मराठा समाजाची आतापर्यंत झालेली आंदोलने ही शांततेत लोकशाही पद्धतीने झाली पण आता महाराष्ट्र शासन मराठा समाजाची आंदोलने चिरडून टाकण्यासाठी पोलीस बाळाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे अन्याय मराठा समाजावर मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून मराठा समाजाच्या युवकांना पोलीस कोठडीत दाबले जात आहे तसेच सारथीच्या माध्यमातून असलेल्या योजना समाज घटकापर्यंत घेऊन सरकार जात नाही जिल्ह्यातील अनेक अधिकारी हे मराठा समाजातला वाईट वागणूक देत आहेत असे त्यांनी सांगून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलने केली जाणार आहेत तालुकास्तरावर ५ सप्टेंबर रोजी आणि जिल्हास्तरावर ६ सप्टेंबर रोजी जबाब दो हे आंदोलन असणार आहे या आंदोलनामध्ये जालना बरोबरच स्थानिक विषय असणार आहेत असे त्यांनी सांगितले.

सरकारने भाटिया आयोगाची नेमणूक करून ओबीसी लोकसंख्येची गणना केली असता महाराष्ट्रात ३७ टक्के ओबीसी असल्याचा निष्कर्ष या आयोगाने काढला घटनात्मक पातळीवर लोकसंख्येच्या अर्धे टक्के म्हणजे १८ ते १९ टक्के आरक्षण मिळू शकते. पण ओबीसी समाजाला ३२ टक्के आरक्षण असून हे फुगीर आरक्षण कमी करताना सरकार समोर पेच निर्माण झाला असून ओबीसी समाजाचा हट्टहास आहे की आमच्या आरक्षणात मराठा समाजाला येऊ देणार नाही आणि या निर्माण झालेल्या पेच प्रसंगामुळे सकल मराठा समाजाची आंदोलने सरकारकडून चिरडली जात आहेत असा आरोपही ॲड. सुहास सावंत यांनी केला.