पंचायत समिती देवगड इथं संत गाडगेबाबा जयंती साजरी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 23, 2024 11:28 AM
views 244  views

देवगड : संत गाडगेबाबा यांची जयंती पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी उच्चस्तर वर्ग - १ वृक्षाली यादव यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक  मेधा राणे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, विस्तार अधिकारी (ग्रा. प.) अंकुश जंगले, वरीष्ट सहाय्यक विलास लोके, कनिष्ठ सहाय्यक प्रमोद खिचडे, वरीष्ठ सहाय्यक  शामल काळसेकर, कनिष्ठ सहाय्यक शेवंता ठाकरे, कनिष्ठ सहाय्यक प्रज्ञा सावंत, कनिष्ठ सहाय्यक एकनाथ बिले, अनंत लाड, विजय फोंडेकर आदी उपस्थित होते.