आंबोली सैनिक स्कूलचा १०० टक्के निकाल...!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2024 13:00 PM
views 192  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करून या गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवला. सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने सलग १६ वर्षे सातत्यपूर्ण १०० टक्के निकाल लावत शैक्षणिक उत्कृष्टतेचे दैदीप्यमान प्रदर्शन घडविले आहे. आरतीय सैन्यसेवेत अधिकारी पदासाठी तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे हे प्रतिक आहे.

मार्च २०२४ च्या शालांत परीक्षेसाठी 40 वि‌द्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 23 विदयार्थी विशेष श्रेणीत व 16 विदयार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशवंत विद्यार्थ्यांमध्ये कॅडेट गिरीराज बाळकृष्ण मुंडले ९० टक्के % प्रथम, कॅडेट सोहम राजेश बोऱ्हाडे ८९.८० द्वितीय, कॅडेट रितेश रत्नकांत हरमलकर,८९ टक्के तृतीय मिळविला. सैनिक स्कूल या निवासी शाळेने वर्षभराचे सुयोग्य नियोजन, काटेकोर अंमलबजावणी, अतिरिक्त विशेष मार्गदर्शन असा आपला पॅटर्न तयार केल्याने सातत्यपूर्ण १००% व दर्जेदार निकाल लावल आपला लौकिक कायम राखला आहे.

100 टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष व सचिव श्री. सुनिल राऊळ सर तसेच संचालक श्री. जाय डॉन्टस, श्री. शंकर गावडे, श्री. शिवाजी परब व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

इयत्ता अकरावीसाठी विज्ञान प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत अनेक वि‌द्याथ्र्यांनी NDA लेखी परिक्षेत तसेच JEE CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक वि‌द्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चट नेवी, बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत युद्ध कौशल्य आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते.