
कणकवली : कणकवली तालुक्यातील नाटळ हायस्कूल मधील गरीब होतकरू, ज्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांना साईबाबा सोशल क्लबच्यावतीने आज विद्यार्थ्यांना स्टीलचे पाणी बॉटल्स वितरित करण्यात आल्या. नाटळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तेली, माजी मुख्याध्यापक वळंजु, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वळंजु यांनी निवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी साईबाबा सोशल क्लब संस्थेचे अध्यक्ष मेंगेल मंथेरो यांच्या सहकार्याने साईबाबा सोशल क्लब संस्थेचे सदस्य उत्तम वाळके, सुधीर साटम यांच्यावतीने नाटळ मधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या स्टील बॉटल्स वितरित केल्या. यापुढे ही गरीब होतकरु मुलांसाठी पुस्तके, आणि शालेय पोशाख पण देऊ अशी इच्छा व्यक्त केली. सचिन तांबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी प्रसाद पांगम, समीर सावंत उपस्थित होते.